पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन .....
आंदोलनाद्वारे केली महिला सुरक्षेची मागणी
पुणे शहरातील महिला, युवती व विद्यार्थिनींवरील वाढते अत्याचार, व बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या शहराध्यक्ष, खा.अॅड.वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठ येथील कार्यालयासमोर हे आंदोलन झाले.
महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे-पाटील, महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर, नगरसेविका आंदेकर ,प्रीया गदादे-पाटील, अॅड.औदुंबर खुने-पाटील, नगरसेवक महेंद्र पठारे, प्रदिप गायकवाड, युवक अध्यक्ष राकेश कामठे, युवती अध्यक्ष मनाली भिलारे, भोलासिंग अरोरा, रजनी पाचंगे, लक्ष्मी आंदेकर, शशिकला कुंभार, पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या घंटानाद आंदोनात सहभागी झाले होते. या आंदोलनाद्वारे घोषणा देऊन मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचा निषेध नोंदविण्यात आला.
‘मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेला जबाबदार आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. आमदाराच्या मुलीवर देखील हल्ला झाला होता, हे खुप गंभीर आहे. महिला सुरक्षेची हमी तुम्हाला देता येत नाही हे दुदैव आहे. महिला सुरक्षेची हमी द्या, नाही तर घरी जा’ अशा शब्दात विरोधी पक्ष गटनेते चेतन तुपे यांनी निषेध केला.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक यांना पुणे शहरातील महिला, युवती व विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्याच्या मागणीबाबत निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले .