Tuesday, April 18, 2017

ॲड. वंदना चव्हाण यांच्या कारकिर्दीचा रौप्यमहोत्सव....

ॲड. वंदना चव्हाण यांच्या कारकिर्दीचा रौप्यमहोत्सव....
पुणे शहराच्या अध्यक्ष व खासदार Vandana Chavan यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
पक्षाचे प्रवक्ते,जेष्ठ नेते श्री. अंकुश काकडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे व पक्षाचे नगरसेवक व सेल प्रमुख उपस्थित होते.
वकील म्हणून शिवाजी नगर कोर्टात काम करणाऱ्या अॅड. वंदना चव्हाण यांनी १९९२ सालची महानगरपालिका निवडणूक लढवत सभागृहात नगरसेवक म्हणून प्रथमतः प्रवेश केला. नंतर पुढील सलग २ पंचवार्षिक निवडणुकांत त्यांना यश प्राप्त झाले . आपल्या शिक्षणाचा उपयोग करत वंदना चव्हाण यांनी आपल्या मातदारसंघात सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या व परिसराचा विकास साधला.
१९९८ साली, महापौर पदाच्या सर्वसाधारण गटातून त्या महापौर म्हणून निवडून आल्या. आपल्या महपौर पदाच्या काळात त्यांनी अनेक शहरहिताचे निर्णय घेत पुणेकरांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण केली. याच महपौर पदाच्या काळात त्यांनी महिला साक्षरता मोहीम राबवली या मोहिमेंतर्गत पुण्यातील सुमारे चव्वेचाळीस हजार महिलांना साक्षर केले.
२००० साली स्फूर्ती महिला मंडळाची स्थापना करत त्यांनी आर्थिकदुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आधार दिला.आज ह्या संस्थेला १७ वर्षे पूर्ण झाली आहे.
२०१० साली वंदना चव्हाण या महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या. या काळात देखील त्यांनी पुण्याच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत आवाज उठवला.
पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. आज सलग ७ वर्षे त्या पुणे शहराच्या अध्यक्ष म्हणून सक्षमपणे धुरा सांभाळीत आहे.
२०१२ साली राज्यसभेच्या खासदार म्हणून त्या राज्यसभेत निवडून गेल्या .अभ्यासू वृत्तीने राज्यसभेत त्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी स्वःताची वेगळी ओळख निर्माण केली आहे .
'अलर्ट' या संस्थे'मार्फत पर्यावरण व शाश्वत विकासा यासंदर्भात त्या कार्यरत आहे. जागतिक तापमान वाढ व त्याचे दुष्परिणाम याविषयी त्यांनी ५०० हून अधिक व्याख्याने विविध ठिकाणी दिली आहेत. अंतराष्ट्रीय परिषदांमध्ये देखील त्यांनी या संदर्भात विशेष योगदान दिले आहे.
२५ वर्षाच्या या काळात वंदना चव्हाण यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मांच्या विविध शिष्वृत्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत.
जागतिक स्तरावर काम करणाऱ्या वुमेन मेट्रो पोलिटीयन्स या संस्थेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे.
पुणे शहर व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांच्या राजकीय व सामाजिक जीवनास २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!
Image may contain: 9 people, people smiling
Image may contain: 5 people

No comments:

Post a Comment